भारत हा शेतीप्रधान देश आहे पण त्या मानाने शेतकरी तितका संपन्न नाही हे आपल्याला वेळोवेळी जाणवलेलेलच आहे. कित्येक दशकांपासून आपल्या देशासमोर शेतकऱ्याचा समस्या आहेत पण कोणतेही सरकार त्या प्रश्नांवर ठोस उत्तर शोधू शकलेले नाही. याचे एक मुख्य कारण म्हणजे इतर गोष्टींसोबत शेतकऱ्यांचे न होणारे आधुनिकीकरण आणि प्रचंड कमी राजकीय महत्वाकांक्षा. ह्याच समस्या नजरेसमोर ठेऊन, अनेक शेतकऱ्यांनी, उदा : श्री ज्ञानेश्वर बोडके साहेब यांनी अभिनव फार्मर्स क्लब या सारखे आधुनिक आणि अत्यंत उपयोगी असे शेतीविषयक प्रयोग करून, यशस्वी करवून दाखवले. आज या क्लब मुळे, शेतकरी पुन्हा एकदा समृद्ध होत आहे. शेतकऱ्यांचा ऱ्हास होण्यामागे अजून एक कारण म्हणजे, शेतीसाठी वापरले जाणारे ‘रासायनिक खत’. रासायनिक खतांमुळे उत्पन्न तात्पुरते वाढते पण मातीतली ताकद, त्या उत्पादनातील ताकद सगळीच निघून जाते. त्यातून निर्माण होतात आजार आणि इतर गोष्टी.

 

 

याच सगळ्या गोष्टी लक्षात घेता, आम्ही काही वर्षांपूर्वी, बारामती इको सिस्टिम्स ची सुरुवात केली. शेतकरी संपन्न व्हावा हाच आमचा उद्देश. शेतकऱ्याला, कायम स्वरूपाचे मोफत ‘सेंद्रिय खत’ मिळावे आणि त्याच सोबत स्वतःच्या घरातील स्वयंपाक देखील करण्यासाठी पैसे खर्च न व्हावेत म्हणून आम्ही निर्माण केला बारामती इको सिस्टिम्स चा बायोगॅस. जवळपास प्रत्येक शेतकऱ्याकडे, दोन तरी जनावरे असतातच ! त्यांच्या शेणातून, या संयंत्रामध्ये गॅस निर्माण करता येईल आणि गॅस निर्मिती च्या वेळेला तयार होणाऱ्या स्लरीचा वापर संपूर्ण सेंद्रिय खत म्हणून करता येईल या उद्देशाने चालू केलेला हा प्रकल्प आज केवळ महाराष्ट्रातच नव्हते तर संपूर्ण भारतात चर्चिला जात आहे.

 

 

या संयंत्राची पाहणी करण्याकरता, काल, दिनांक २० मार्च २०२३ रोजी, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय भारत सरकार कडुन काही लोक पाहणी करायला आले होते. बारामती इकोसिस्टीम्स चे संयंत्र आणि या संयंत्राची प्रक्रिया समजून घेतल्यावर, आलेल्या पाहुण्यांना कौतुक वाटले आणि शेतकऱ्याचा शाश्वत विकासासाठीच हे संयंत्र तयार केले आहे याची खात्री त्यांना पटली. बारामती इको सिस्टिम च्या टीम साठी हि मोठी गोष्ट !

 

 

अधिक माहिती करिता कॉल करा – ९५२७७३०९९९/ ९६३७८००९९९